शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

नगर दक्षिणेतून प्रसंगी अपक्ष लढण्याचे सुजय विखेंचे सूचक वक्तव्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 23:15 IST

पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले.

पाथर्डी : पक्षाच्या बाहेर जाऊन आपण जनतेच्या कामाला प्राधान्य देतो. ‘जनसेवा’ संघटनेचे कार्यकर्ते प्रसंगी ‘सायकल’ हाती घेऊन जनतेचे काम करतील, असे प्रतिपादन डॉ. सुजय विखे यांनी शुक्रवारी रात्री पाथर्डीत गेले. त्यांच्या या वक्तव्याला माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी ‘सायकल’ चिन्ह घेऊन अपक्ष लढविलेल्या निवडणुकीचा संदर्भ असल्याचे मानले जात आहे.डॉ. सुजय यांनी पाथर्डीत ‘जनसेवा’ या आपल्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले, मी कुठल्याही पक्षाचा नाही. मी नेता नसून कार्यकर्ता आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी मी मेंदूचा डॉक्टर आहे. पन्नास वर्षाच्या कालावधीत विखे कुटुंबीयांनी स्वच्छ राजकारण व समाजकारण केले. आमच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही.जनतेसाठी कुठलीही तडजोड आम्ही करत नाही. पाथर्डीच्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीने सातत्याने चुका केल्या. भाजपा सदैव चुकत आहे, तर सेना सुधारायला तयारच नाही. त्यामुळे जनता वाºयावर आहे. मी पक्ष न पाहता जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून काम करणार आहे. जनसेवेचे कार्यकर्ते जनतेसाठी ‘सायकल’ देखील हाती घेतील, असे ते म्हणाले.१९९१ साली बाळासाहेब विखे यांनी ‘सायकल’ चिन्ह घेऊन नगर दक्षिणेतून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे सुजय यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहेत. यावेळी अरुण आठरे, मोहन पालवे, भाऊसाहेब राजळे, काशीनाथ लवाडे, संभाजी वाघ, गहिनीनाथ थोरे, नासीर शेख, सहदेव शिरसाठ,शंकरराव पालवे, बंडूशेठ बोरुडे, अजय रक्ताटे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय रक्ताटे यांनी तर आभार बंडूशेट बोरुडे यांनी मानले.

विखेंकडून बदलाचे सूचक विधान

डॉ. सुजय विखे यांचे भाषण सुरु होताच खाली बसलेल्या कार्यकर्त्याने हाताचा पंजा... पंजा असे ओरडून सांगितले. त्यावेळी सुजय विखे यांनी थोडा बदल आहे, असे व्यासपीठावरून सूचक विधान केले. त्यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

पक्षापेक्षा जनतेला महत्त्व

नगर तालुक्यात चिचोंडी पाटील येथेही विखे यांचा मेळावा झाला. तेथील सभेत विखे यांनी भाजप व कॉंग्रेसकडून लोकसभा लढवावी, अशी मागणी आपल्या भाषणात अनुक्रमे भाजपचे मनोज कोकाटे व कॉंग्रेसचे विनायक देशमुख यांनी केली. यासंदर्भात बोलताना आपण कुठल्याही पक्षापेक्षा जनतेला महत्त्व देतो, असे सुजय म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSujay Vikheसुजय विखेPathardiपाथर्डीcongressकाँग्रेस