वंचित शेतकऱ्यांचे पवारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:35+5:302021-02-05T06:42:35+5:30

राहुरी : तालुक्यातील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्यावतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शेतकरी संजय रामदास मोकाटे, अमोल मोढे, ...

Statement of deprived farmers to Pawar | वंचित शेतकऱ्यांचे पवारांना निवेदन

वंचित शेतकऱ्यांचे पवारांना निवेदन

राहुरी : तालुक्यातील कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्यावतीने माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना शेतकरी संजय रामदास मोकाटे, अमोल मोढे, शिवाजी मगन मोकाटे यांनी निवेदन देत या शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी विचार करण्याची मागणी केली आहे.

भाजप सरकारच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेपाठोपाठ महाविकास आघाडी सरकारच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेपासूनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी वंचित राहिले आहेत. दोन्ही योजना राबविताना तारखेच्या घोळात शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. संबंधित शेतकरी थकबाकीदार राहिले. परिणामी शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळेनासे झाले आहे. वंचित शेतकऱ्यांनी रविवारी शेंडी-भंडारदरा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात याबाबतचे निवेदन शरद पवार यांच्याकडे दिले असून, त्यातून आपले गाऱ्हाणे मांडले आहे. दोन्ही योजनांच्या लाभापासून राहुरी तालुक्यातील शेतकरी वंचित आहेत, याचा विचार सरकारने करावा, अशी मागणी पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

Web Title: Statement of deprived farmers to Pawar