एकनाथ ढाकणे यांना राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:20 IST2021-03-15T04:20:23+5:302021-03-15T04:20:23+5:30
ढाकणे यांची एकूण सेवा ३४ वर्षे झालेली असून या सेवा कालखंडात त्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत पातळीवर राबविले. गणोरे ...

एकनाथ ढाकणे यांना राज्यस्तरीय गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर
ढाकणे यांची एकूण सेवा ३४ वर्षे झालेली असून या सेवा कालखंडात त्यांनी अतिशय नावीन्यपूर्ण उपक्रम ग्रामपंचायत पातळीवर राबविले. गणोरे गावचा चेहरामोहरा बदलवून यामध्ये एक मॉडेल व्हिलेज, कामात गतिमानता व पारदर्शकता आणण्याचे काम त्यांनी केले आहे. सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती, वृक्ष लागवड, आयएसओ ग्रामपंचायत, विविध योजना, संत गाडगेबाबा अभियानात जिल्हास्तरीय दुसरा क्रमांक, तालुकास्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त झालेला असून लोकसहभागातून अनेक कल्याणकारी कामे या कालखंडात झालेली आहेत. तीर्थक्षेत्र विकास, शाळा सुधार, पिण्याचे पाणी शुद्धिकरण, जलसंधारण शेतकऱ्यांसाठी विविध उपक्रमशील सेवेचे मार्गदर्शन, ग्रामपंचायत सेवेची कर वसुली, दैनंदिन आरोग्य, शिक्षण सेवा सुविधा या बाबींवर विशेष भर देऊन ग्रामस्थांना विविध योजनांचा लाभ दिलेला आहे. या कामांची दखल घेऊन ग्रामविकास अधिकारी एकनाथ ढाकणे यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार जाहीर झालेला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष राजश्री घुले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, निखिलकुमार ओसवाल, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी यांनी कौतुक केले.