आपत्तीग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य सरकारचा हात आखडता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:01+5:302021-07-28T04:22:01+5:30
विखे म्हणाले, कोकणामध्ये आलेले नैसर्गिक संकट भीषण असून राज्य सरकारने तत्काळ मदत जाहीर करणे अपेक्षित होते. पण तसे होताना ...

आपत्तीग्रस्तांच्या मदतीकरिता राज्य सरकारचा हात आखडता
विखे म्हणाले, कोकणामध्ये आलेले नैसर्गिक संकट भीषण असून राज्य सरकारने तत्काळ मदत जाहीर करणे अपेक्षित होते. पण तसे होताना दिसत नाही. माणुसकीचा धर्म म्हणून मतदार संघातील सर्व गावातून कार्यकर्ते शक्य ती मदत गोळा करणार आहेत. आम्ही कोकणातील आपत्तीग्रस्तांना ही मदत पाठवणार आहोत. यापूर्वी राज्यात अनेक नैसर्गिक संकट आली. पण राज्य सरकारची कोणतीच मदत आपत्तीग्रस्त किंवा शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही. पीक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना कोणताच लाभ झाला नाही. आपत्तीत सरकारने नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे.
कोकणातील नागरिकांच्या मदतीसाठी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून मदत पाठविण्याचे नियोजन गावपातळीवर करण्याच्या सूचना आमदार विखे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत. जमा झालेली एकत्रित मदत संकटग्रस्त कुटुंबीयांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.