शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : शिर्डीसाठी आजपासून रणधुमाळी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 13:39 IST

शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना २ एप्रिल रोजी जारी होणार असून त्या दिवसापासूनच नामनिर्देश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांनी दिली.

अहमदनगर : शिर्डी राखीव लोकसभा मतदारसंघासाठीची अधिसूचना २ एप्रिल रोजी जारी होणार असून त्या दिवसापासूनच नामनिर्देश प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी तथा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांनी दिली. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. शिर्डीसाठीही जिल्हाधिकारी कार्यालयातच अर्ज प्रक्रिया पार पडणार आहे.शिर्डीसाठी २ ते ९ एप्रिलपर्यंत अर्ज दाखल करता येतील. १० एप्रिलला छाननी होईल. १२ एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या मतदारसंघात एकूण १७१० मतदान केंद्र आहेत. ८ लाख १० हजार ८८९ पुरूष व ७ लाख ५० हजार ६०६ स्त्रिया असे एकूण १५ लाख ६१ हजार ५५० मतदार या मतदारसंघात आहेत. एकूण साडेतीन हजार मतदान यंत्र वापरण्यात येणार असून साडेसात हजार कर्मचाऱ्यांची नेमणूक मतदान प्रक्रियेसाठी केली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहाय्य करण्यासाठी रोहयोचे उपजिल्हाधिकारी जितेंद्र वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अर्ज भरताना उमेदवारांसह केवळ ४ जणांनाच दालनात येता येईल. उमेदवारांना आॅनलाईन आणि आॅफलाईन अशा दोन्ही प्रकारे अर्ज भरता येईल.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९shirdi-pcशिर्डी