बाळसाहेब देशपांडे रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:20 IST2021-03-06T04:20:41+5:302021-03-06T04:20:41+5:30
अहमदनगर : महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन कार्यान्वित करून रुग्णालयातील मनुष्यबळ वाढविण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने ...

बाळसाहेब देशपांडे रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन सुरू करा
अहमदनगर : महानगरपालिकेच्या बाळासाहेब देशपांडे रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन कार्यान्वित करून रुग्णालयातील मनुष्यबळ वाढविण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने निवेदनाव्दारे करण्यात आली.
जनाधार संघटनेचे शहराध्यक्ष शहानवाज शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्त सचिन राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी संघटनेचे अमित गांधी, फारुक शेख, वसीम शेख, मीजान कुरेशी, शाहिद सय्यद, अरबाज शेख, दिशान खान, दीपक गुगळे, रिजवान सय्यद आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात शेख यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात सोनोग्राफी मशीन असून देखील त्याचा लाभ सर्वसामान्य गोर-गरीब कुटुंबीयांना मिळत नाही. सोनोग्राफी मशीनचे ऑपरेटर कायम सुट्टीवर असतात. त्यामुळे गरोदर मातांना खासगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जावे लागते. त्यासाठी त्यांना अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागतात. त्यात जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण व तपासणी सुरू असल्याने गरोदर महिलांची तपासणी व प्रसूती बंद आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य गोर-गरीब महिला प्रसूतीसाठी बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात येतात. परंतु, मनुष्यबळ अपुरे असल्याने नागरिकांना सेवा देणे कठीण आहे. त्यामुळे बाळासाहेब देशपांडे रुग्णालयात असलेली सोनोग्राफी मशीन कार्यान्वित करण्यासाठी कायमस्वरूपी ऑपरेटर नेमावा. तसेच येत्या आठ दिवसात रुग्णालयातील मनुष्यबळ वाढवावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हंटले आहे.
...
सूचना फोटो: ०५ एएमसी नावाने आहे.