मनमाड - दौंड मार्गावरील पॅसेंजर गाड्या सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:36 IST2021-02-06T04:36:36+5:302021-02-06T04:36:36+5:30
टेके म्हणाले, कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी येथे कान्हेगाव रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर पूर्वी नगर, दौंड, पुणे ...

मनमाड - दौंड मार्गावरील पॅसेंजर गाड्या सुरू करा
टेके म्हणाले, कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील वारी येथे कान्हेगाव रेल्वे स्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर पूर्वी नगर, दौंड, पुणे येथे जाण्यासाठी एकूण तीन पॅसेंजर गाड्या तर मनमाड, मुंबई, नांदेड येथे जाण्यासाठी तीन अशा वेगवेगळ्या वेळेत सहा पॅसेंजर गाड्या होत्या. कोरोना या वैश्विक संकटामुळे मागील वर्षी सर्वच जनजीवन विस्कटले होते. त्याचा परिमाण सर्वच क्षेत्रावर झाला. तसा रेल्वेवर देखील झाला होता. परंतु, गेल्या काही महिन्यापासून जनजीवन सुरळीत होत आहे. हे होत असतांना रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस गाड्या सुरू केल्या आहेत. परंतु, अद्यापपर्यंत पॅसेंजर गाड्या सुरू केल्या नाहीत.
तालुक्याच्या पूर्व भागातील वारी, कान्हेगाव, सडे, खोपडी, भोजडे, तळेगाव मळे, धोत्रे, गोधेगाव, दहिगाव बोलका, संवत्सर आदी गावातील ग्रामस्थ हे पॅसेंजरने प्रवास करण्यासाठी कान्हेगाव येथील रेल्वे स्थानकावर येतात. त्यामुळे येथून बहुसंख्य लोक रोज ये जा करत असतात. तसेच वरील गावातील विविध पेन्शनधारक, शासकीय तसेच खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय उपचारासाठी, नोकरीसाठी पॅसेंजर रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. विशेष म्हणजे ज्यांच्याकडे स्वतःचे साधन नाही, अशा नागरिकांची फार मोठी गैरसोय होत आहे असेही टेके यांनी शेवटी म्हटले आहे.