पॅसेेंजर रेल्वे सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:42 IST2021-02-05T06:42:28+5:302021-02-05T06:42:28+5:30
देशात गेल्या मार्चपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सर्व राज्यातील एस.टी., रेल्वे सेवा, शैक्षणिक संस्था, मार्केट व गर्दीची ठिकाणे ...

पॅसेेंजर रेल्वे सुरू करा
देशात गेल्या मार्चपासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सर्व राज्यातील एस.टी., रेल्वे सेवा, शैक्षणिक संस्था, मार्केट व गर्दीची ठिकाणे बंद ठेवण्यात आली. आता हळूहळू सर्वच क्षेत्रे खुली करण्यात आली आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस सुरू केल्या. परंतु सामान्य जनतेसाठी असणारी पॅसेंजर अद्याप सुरू न केल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. एसटी बसेस सुरू आहेत. मात्र, भाडेवाढीमुळे एसटीचा प्रवास सामान्य माणसाला परवडेनासा झाला आहे. हे हाल होऊ नये म्हणून केंद्र सरकारने त्वरित पॅसेंजर रेल्वे सुरू कराव्यात, अशी मागणी सिंधी समाजाचे संजय माखिजा, बबलू सिंधीवाणी, किशोर छतवाणी, बबलू आहुजा, श्रीचंद आहुजा, जवाहर कुकरेजा, कन्हैयालाल कुकरेजा, गुरुमुखलाल रामनाणी, अनिल लुल्ला, अशोक भागवाणी, आशिष बठेजा, मनोहरलाल बठेजा, जयकिशन तलरेजा, प्रेम तलरेजा, हितेश चुग, दीपक लच्छाणी, मनोहर गुलवाणी, दीपक वलेशा, शाम सिंधवाणी आदींनी केली आहे.