नियम शिथिल करून बाजारपेठा सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:22 IST2021-04-09T04:22:14+5:302021-04-09T04:22:14+5:30
लाॅकडाऊनच्या नियमावलीमुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन ...

नियम शिथिल करून बाजारपेठा सुरू करा
लाॅकडाऊनच्या नियमावलीमुळे मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठ्या प्रमाणावर रोष निर्माण झाला आहे. लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. व्यापारी बाजारपेठ बंद राहिल्याने दुकानात काम करणारे कामगार व त्यांच्या कुटुंबाची आर्थिक कोंडी झाल्याने प्रपंच चालवणे कठीण झाले आहे. लाॅकडाऊन निश्चित करताना सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाचे हित लक्षात घेतले नाही.
मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यासह देशात वाढत होता. महामारीशी लढण्याबाबत आपण आपल्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती व उपाययोजना उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे व्यापारी बाजार पेठ बंद न ठेवता सुरू करण्यास शासनाकडून संबंधित यंत्रणेस आदेश होणे गरजेचे आहे.
व्यापारी बाजार पेठ सुरू असताना कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्याच्या दृष्टीने उचित उपाययोजना करण्याबाबत सूचित करावे. जेणेकरून सर्वसामान्य नागरीक, कामगार, व्यापारी ग्राहक यांची आर्थिक कोंडी व गैरसोय होणार नाही. त्यामुळे लाॅकडाऊनच्या निर्णयामध्ये शिथिलता करून व्यापारी बाजारपेठ सुरू करण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात यावा. अन्यथा पेठेतील व्यापारी ९ एप्रिलपासून कोरोना संदर्भातील सर्व नियम व अटींचे पालन करुन आपापली दुकाने उघडतील, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश पारख, माजी नगराध्यक्ष अनिल कासार, केमिस्ट असोसिएशन शहराध्यक्ष सुर्यकांत भूजाडी, स्टेशनरी असोसिएशन शहराध्यक्ष अनिल भट्टड, कांता तनपूरे, प्रवीण दरक, विलास तरवडे, देवेंद्र लांबे, रवींद्र उदावंत, अख्तर कादरी, महेश कोरडे, वैभव धुमाळ, एकनाथ खेडेकर, नंदकिशोर भट्टड, मोहन जोरी, सचिन वने, संतोष लोढा, आनंद मुथ्था, दिलीप चौधरी, जसविंदर कथुरिया आदींच्या सह्या आहेत.