नेवासा शहरात कोविड रुग्णालय सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:16 IST2021-06-21T04:16:06+5:302021-06-21T04:16:06+5:30
नेवासा : शहरात नगरपंचायतीमार्फत कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत प्रशासनास ...

नेवासा शहरात कोविड रुग्णालय सुरू करा
नेवासा : शहरात नगरपंचायतीमार्फत कोविड रुग्णालय सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन भाजपच्या वतीने शहराध्यक्ष मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत प्रशासनास देण्यात आले.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या अनुषंगाने काळजी घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच शासनाने यासाठी नगरपंचायतीला उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दिले आहेत. नेवासा शहराचा मागील दोन्ही लाटांमधील रुग्णसंख्येचा आलेख पाहता आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपण नगरपंचायतीमार्फत १०० बेडचे सर्व सोयीसुविधांयुक्त कोविड हॉस्पिटल लवकरात लवकर उभारावे. त्यामध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र वाॅर्डची व्यवस्था करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी शहराध्यक्ष मनोज पारखे, ओबीसी मोर्चाचे युवक संपर्क प्रमुख निरंजन डहाळे, शहर उपाध्यक्ष राजेश कडू, सरचिटणीस आप्पासाहेब गायकवाड, युवा मोर्चाचे प्रतीक शेजूळ, आकाश देशमुख, अमोल कोलते उपस्थित होते.