नाफेडमार्फत मूग, उडीद, सोयाबीनचे हमीभाव केंद्र सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:33+5:302021-09-25T04:21:33+5:30
पारनेर : पारनेर तालुक्यात मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. सध्या शेतकऱ्यांच्या मूग, उडीद ...

नाफेडमार्फत मूग, उडीद, सोयाबीनचे हमीभाव केंद्र सुरू करा
पारनेर : पारनेर तालुक्यात मूग, उडीद, सोयाबीन या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली होती. सध्या शेतकऱ्यांच्या मूग, उडीद या पिकांची काढणी झालेली आहे. सोयाबीन पिकाची काढणी चालू आहे. त्यामुळे लवकरच मोठ्या प्रमाणात सोयाबीनचीही आवक बाजारात होणार आहे. त्यामुळे नाफेडमार्फत मूग, उडीद व सोयाबीन हमीभाव केंद्र तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी बाजार समिती सभापती प्रशांत गायकवाड यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्याकडे केली आहे. कृषी बाजार समितीमार्फत हमीभाव खरेदी केंद्र गेल्या पाच वर्षांपासून चालविण्यात येत आहे. या केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या एफ.ए.क्यू. दर्जाच्या मालाची हमीभावाने खरेदी करण्यात येते. पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात ऑनलाइन पद्धतीने जमा करण्यात येतात. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिकच फायदा होऊन योग्य बाजारभाव मिळतो.