भंडारदऱ्यातून आवर्तन सुरू
By | Updated: December 5, 2020 04:38 IST2020-12-05T04:38:29+5:302020-12-05T04:38:29+5:30
भंडारदरा-निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील गावांमधून होत होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता ...

भंडारदऱ्यातून आवर्तन सुरू
भंडारदरा-निळवंडे धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील गावांमधून होत होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता निळवंडे धरणातून १ हजार २०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात केली. पिण्याच्या पाण्याचे हे आवर्तन अंदाजे चार दिवस चालणार असून, यात ४०० ते ४५० दशलक्ष घनफूट पाण्याचा वापर होणार असल्याचे शाखा अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले. आवर्तन सोडतेवेळी निळवंडे धरणातील पाणीसाठा ८ हजार २८५ दशलक्ष घनफूट इतका होता.