एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष
By Admin | Updated: December 18, 2015 23:15 IST2015-12-18T23:09:51+5:302015-12-18T23:15:43+5:30
संगमनेर : राज्य परिवहन महामंडळाचा संप मिटताच शुक्रवारी दुपारी संगमनेर बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी सवाद्य फटाके वाजवून घोषणा देत आनंद व्यक्त केला.

एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष
संगमनेर : राज्य परिवहन महामंडळाचा संप मिटताच शुक्रवारी दुपारी संगमनेर बसस्थानकात एसटी कर्मचाऱ्यांनी सवाद्य फटाके वाजवून घोषणा देत आनंद व्यक्त केला.
विविध मागण्यांसाठी गेल्या दोन दिवसांपासून परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपामुळे सर्व बसेस थांबून धरण्यात आल्याने बसस्थानकांवर शुकशुकाट पसरला. बसेसअभावी प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, आज दुपारी शासनाने मागण्या मान्य केल्याचे वृत्त येताच बसस्थानकात एकत्र झालेल्या वाहतूक नियंत्रक, वाहक, चालक, मदतनीस व इतर कामगारांनी एकच जल्लोष केला.
फटाके फोडून व वाद्य वाजवून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी शिवराम शिंदे, रामदास नरवडे, सत्तार शेख, रावसाहेब पर्बत, ए.एस.कोबरणे, नंदू कानकाटे, सोपान जोंधळे, रोहिदास कांगणे, विठ्ठल गागरे आदींसह आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)