कोपरगाव : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित ५४ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सर्वाधिक २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले.आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या कुस्ती, कबड्डी, शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकारात एकूण ६७५ महिला व पुरूष खेळाडूंनी सहभाग घेतला. रत्नागिरी विभागास प्रथम, पुणे व कोल्हापूर विभागांना प्रत्येकी २० पदके मिळवून द्वितीय तर रायगड विभागास १६ पदकांसह तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्यांना महामंडळाचे मुख्य लेखाधिकारी अशोक फळणीकर यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. यावेळी महाव्यवस्थापक माधव काळे, उपमहाव्यवस्थापक मधुकर पटारे, विभाग नियंत्रक नितीन मैंद, आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठल होन, विश्वस्त प्रकाश भट, प्रकाश गिरमे, विष्णूपंत पवार, बाबा बांदल आदी उपस्थित होते.पुरूष गटात (१००, २०० व ४०० मीटर धावणे) पुणे विभागाचे धैर्यशिल निराळे तर महिला गटात अहमदनगर विभागाच्या स्वरूपा वैद्य यांनी प्रथम क्रमांकासह वैयक्तिक सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. सूत्रसंचालन अजय देसाई यांनी केले. स्पर्धेसाठी क्रीडा विभागप्रमुख अशोक कांगणे, क्रीडा शिक्षक अजित पवार, गणेश म्हस्के, सुरेश शिंदे, भुषण पाटील, रणजित लेंभे, सत्येंद्र त्रिपाठी यांनी विशेष परिश्रम घेतले.
एसटी महामंडळ क्रीडा स्पर्धा : रत्नागिरी विभागास सर्वसाधारण विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 17:18 IST
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित ५४ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत रत्नागिरी विभागाने सर्वाधिक २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले.
एसटी महामंडळ क्रीडा स्पर्धा : रत्नागिरी विभागास सर्वसाधारण विजेतेपद
ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अहमदनगर विभाग आयोजित ५४ व्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धारत्नागिरी विभागाने सर्वाधिक २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटाकाविले.पुणे व कोल्हापूर विभागांना प्रत्येकी २० पदके मिळवून द्वितीय तर रायगड विभागास १६ पदकांसह तृतीय क्रमांक मिळाला.आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या कुस्ती, कबड्डी, शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकारात एकूण ६७५ महिला व पुरूष खेळाडूंनी सहभाग घेतला.