चिचोंडी पाटील येथे प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:28+5:302021-09-25T04:21:28+5:30
चिचोंडी पाटील : चिचोंडी पाटील (ता. नगर) ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून प्रभागनिहाय लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यास ...

चिचोंडी पाटील येथे प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
चिचोंडी पाटील : चिचोंडी पाटील (ता. नगर) ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून प्रभागनिहाय लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. त्यास पहिल्याच दिवशी प्रभाग क्रमांक १ मध्ये २१४ ग्रामस्थांनी कोविड लस घेऊन मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद दिला, अशी माहिती भाजप तालुकाध्यक्ष तथा सरपंच मनोज कोकाटे यांनी दिली.
कोकाटे म्हणाले, संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने गावामध्ये जास्तीत जास्त ग्रामस्थांचे लसीकरण करून घेऊन तिसऱ्या लाटेला गावापासून दूर ठेवण्याचा ग्रामपंचायतीचा मानस आहे. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या सहकार्याने कोरोना लसीकरण सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जे ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित आहेत, अशा ग्रामस्थांना ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने लसीकरणाचे महत्त्व पटवून देऊन त्यांच्या वॉर्डमध्येच लस देण्याचा प्रयत्न केला.
यावेळी उपसरपंच कल्पना ठोंबरे, युवानेते प्रवीण कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य अशोक कोकाटे, अर्चना चौधरी, दीपक हजारे, महादजी कोकाटे, दत्तू धुळे, माउली ठोंबरे, वैभव कोकाटे, भाऊसाहेब बेल्हेकर आदींची उपस्थिती होती.
लसीकरण मोहीम यशस्वी होण्यासाठी ग्रामसेवक देवीदास मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सांगळे, आरोग्य सेविका फुंदे, आरोग्य सेवक लिपणे, ग्रामपंचायत कर्मचारी राजेंद्र तनपुरे, अंगणवाडी सेविका द्रौपदी पांडुळे, आशा ठोंबरे, किरण खराडे, आशा सेविका सविता खराडे, छाया पवणे, मदतनीस इंगळे, बालू बोरुडे, मयूर ठोंबरे, विशाल दहातोंडे, सनी गाडे व साई सेवा प्रतिष्ठानचे विशेष सहकार्य लाभले.