नगर येथील समर वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: May 6, 2016 23:23 IST2016-05-06T23:12:04+5:302016-05-06T23:23:50+5:30

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच नेहमी मुलांसाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. यावेळी देखील आयोजित केलेल्या समर वर्कशॉप २०१६ ला विद्यार्थी व पालकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला.

Spontaneous response to the Summer Workshop in the city | नगर येथील समर वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर येथील समर वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच नेहमी मुलांसाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. यावेळी देखील आयोजित केलेल्या समर वर्कशॉप २०१६ ला विद्यार्थी व पालकांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. २५ एप्रिल ते ३ मे दरम्यान झालेल्या या उपक्रमामध्ये स्पोकन इंग्लिश, अ‍ॅबॅकस, आर्ट अ‍ॅण्ड क्राफ्ट, मॅजिकल सायन्स, डान्स, हॅण्डराईटिंग इ. विषयांसह कार्यशाळा घेण्यात आल्या.
नॉर्थस्टार अ‍ॅकॅडमीच्या वतीने अ‍ॅबॅकसवर कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये अ‍ॅबॅकस कसे वापरावे, संख्या ओळखणे, त्यांची बेरीज-वजाबाकी करणे अशा प्राथमिक परंतु अत्यंत महत्त्वाच्या प्रक्रिया सोप्या पद्धतीने मुलांना समजविण्यात आल्या. अ‍ॅकॅडमीच्या संचालिका शैलजा लोटके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हॅण्डराईटिंग कार्यशाळेत मुलांना फनी हॅण्डराईटींगचे प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये आईस राईटींग, वॉल राईटींग, ग्रेड राईटींग मध्ये मुलांनी स्वत:ची कल्पकता दाखविली. सोलंकी हॅण्डराईटींगच्या अर्चना सोलंकी यांनी मुलांना अक्षर वळण व त्याची आवड निर्माण व्हावी यावर विशेष भर दिला.
स्पोकन इंग्लिश कार्यशाळेत यश स्पोकन इंग्लिशच्या शुभांगी बंगाळे यांनी इंग्रजी व्याकरणामध्ये काळ व त्याचे प्रकार आणि त्याचा व्यवहारात कसा उपयोग करावा, वाक्य निर्मिती कशी करावी याबाबत मार्गदर्शन केले.
डान्स युनिव्हर्सल तर्फे घेण्यात आलेल्या कार्यशाळेत प्रशिक्षक सागर अलचेट्टी यांनी बॉलिवूड, फ्री स्टाईल, फोक तसेच इतर डान्स एक्सरसाईज विद्यार्थ्यांकडून करवून घेतले.

Web Title: Spontaneous response to the Summer Workshop in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.