शुद्धलेखन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

By Admin | Updated: June 3, 2014 00:26 IST2014-06-02T23:33:09+5:302014-06-03T00:26:52+5:30

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच सभासदांसाठी गायकवाड सांस्कृतिक भवन, बिग बाजार समोर, सावेडी रोड, अ.नगर येथे दिनांक १ जून २०१४ रोजी खास शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

Spontaneous response to SpellComption | शुद्धलेखन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

शुद्धलेखन स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद

अहमदनगर : लोकमत बाल विकास मंच सभासदांसाठी गायकवाड सांस्कृतिक भवन, बिग बाजार समोर, सावेडी रोड, अ.नगर येथे दिनांक १ जून २०१४ रोजी खास शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शुद्धलेखन स्पर्धेत १ ली ते ३ री, ४ वी ते ६ वी, ७ वी ते १० वी अशा तीन गटांत विभागणी करण्यात आली होती. यामध्ये १ ली ते ३ री या गटास ‘एक पॅराग्राफ’, ४ थी ते ६ वी या गटास ‘दोन पॅराग्राफ’ आणि ७ वी ते १० वी या गटास ‘तीन पॅराग्राफ’ देण्यात आले होते. स्पर्धकांना ३० मिनीटांचा कालावधी देण्यात आला होता. या सर्व शुद्धलेखनाचे परीक्षण करण्यात आल्यानंतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धकांना अ4 साईजचे पेपर आयोजकांतर्फे देण्यात आले होते. मुले शुद्धलेखनात एवढी मग्न झाली की, मुलांनी शुद्धलेखनाच्या शब्दाशब्दात जिवंतपणा आणला. एकापेक्षा एक मोती अक्षरे काढून आपल्या कलागुणांच्या अफाट शक्तीचा वापर केला. बालचमूंनी परीक्षक, प्रेक्षक यांना अचंबित केले. यावेळी प्रायोजक पी. जी. स्टेशनर्स चे हर्षल शाह, परीक्षक शंतनु संत, सई संत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकात हर्षल शाह यांनी लोकमतच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या. स्पर्धेचा निकाल असा - १ ली ते ३ री गटात प्रथम क्रमांक हर्षली गाडे, द्वितीय क्रमांक नारायणी, तृतीय क्रमांक हिरल जतकर, उत्तेजनार्थ हिना विटणकर, संस्कृती कबाडी. ४ थी ते ६ वी गटात प्रथम क्रमांक सिद्धी झंवर, द्वितीय क्रमांक निर्मल छाजेड, तृतीय क्रमांक आर्या शिदोरे, उत्तेजनार्थ सहिबा पठाण, रचना कुलथे. ७ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांक प्रज्ञा गांधी, द्वितीय क्रमांक मनाली बोरा, तृतीय क्रमांक यश पावसे, उत्तेजनार्थ सार्थक सब्बन, गायत्री देशपांडे यांना पारितोषिके मिळाली. (प्रतिनिधी)

Web Title: Spontaneous response to SpellComption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.