मिरीतील सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:46+5:302021-09-21T04:23:46+5:30
मिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप व युनायटेड सिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे वतीने ...

मिरीतील सर्वरोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
मिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप व युनायटेड सिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्वरोग निदान शिबिराचे वतीने आयोजित मिरी (ता. पाथर्डी) येथे केले होते. या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपकडून समर्थ बूथ अभियान, किसान सन्मान योजना व लाभार्थी सन्मान दिवस साजरा करण्यात आला. शिबिराचे उद्घाटन माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या हस्ते झाले. आमदार मोनिका राजळे अध्यक्षस्थानी होत्या.
राजळे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण, विकास आणि आरोग्याला प्रथम प्राधान्य देत जगात देशाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश भालसिंग, जिल्हा परिषद सदस्य पुरुषोत्तम आठरे, मार्केट कमिटीचे संचालक बाबा पाटील खर्से, सहकार भाजप आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबनराव आव्हाड, डॉ. अतुल गुगळे, डॉ. पीयूष मराठे, डॉ. सुवर्णा होशिंग आदी उपस्थित होते.
यावेळी परिसरातील तीनशेहून अधिक रूग्णांनी आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी डॉ. अमोल नरसाळे यांनी प्रास्ताविक केले. माजी सरपंच संतोष शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सचिव शुभम मोटे यांनी आभार मानले.
---
२० मिरी
मिरी येथे शिबिराचे उद्घाटन करताना आमदार मोनिका राजळे, माजी आमदार शिवाजी कर्डिले व इतर.