कोळगाव येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:16 IST2021-07-20T04:16:41+5:302021-07-20T04:16:41+5:30
विसापूर : ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांची जयंती व पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्या वाढदिवसाच्या ...

कोळगाव येथे रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
विसापूर : ‘लोकमत’चे संस्थापक, स्वातंत्र्यसेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांची जयंती व पंचायत समितीचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांच्या वाढदिवसाच्या निमित्त कोळगाव (ता. श्रीगोंदा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात सोमवारी आयोजित रक्तदान शिबिरात तरुणांनी उदंड प्रतिसाद दिला.
यावेळी विसापूर कारागृहाचे अधीक्षक प्रदीप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहाचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले. या ठिकाणी माजी सभापती पुरुषोत्तम लगड, कोळगावचे उपसरपंच अमित लगड, विसापूर कारागृहाचे तुरुंगाधिकरी राजेंद्र पवार, डॉ. अनिल क्षीरसागर यांनी रक्तदान केले.
शिबिराचे उद्घाटन कर्मयोगी कुंडलिकराव जगताप, कुकडी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व संचालक विश्वास थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सभापती पुरुषोत्तम लगड, कोळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. अमोल आडसरे, डॉ. प्राजक्ता निमसे, नितीन डुबल, माजी उपसरपंच नितीन नलगे, आबासाहेब लगड, नितीन मोहारे उपस्थित होते.
‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी बाळासाहेब काकडे, पत्रकार अंकुश तुपे, मंडल कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सातपुते यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले. रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी जयराज लगड, नितीन नलगे, ‘लोकमत’चे विसापूर प्रतिनिधी नानासाहेब जठार, विकास खामकर, संतोष मेहेत्रे यांनी परिश्रम घेतले.
नगर येथील अष्टविनायक ब्लड सेंटरमार्फत रक्त संकलन करण्यात आले. यावेळी ८७ जणांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना भैय्या लगड मित्र मंडळाच्या वतीने प्रत्येकी एक झाड भेट देण्यात आले.
------
शिबिरातील रक्तदाते....
अमित लगड, राजेंद्र पवार, नंदकुमार शिंदे, विशाल सातपुते, तुषार भोर, सागर सरतापे, उद्धव भगत, संपत शिंगण, अर्जुन दहीफळे, संकेत जगताप, दादा वेटकर, राजेंद्र लगड, अमोल लगड, ऋषिकेश जगताप, श्रीकांत बांदल, अमोल चौधरी, सोमनाथ चोपडे, माउली जगताप, संतोष मुसळे, संदीप कर्डिले, प्रशांत जगताप, सचिन जगताप, अभिजित तिवटणे, विलास शितोळे, अंबादास नलगे, अक्षय लगड, मयूर मोहारे, पंकज लगड, दत्तात्रय लगड, निखिल लगड, सोन्याबापू कवडे, ऋषिकेश बळे, महेश लगड, राहुल झेंडे, नीलेश सपाटे, किरण सपाटे, संदीप सपाटे, अशोक जगताप, धनंजय जगताप, प्रदीप हिरवे, नीलेश बारहाते, अर्जुन नलगे, जालिंदर सपाटे, सुदर्शन घालमे, महेश भरत लगड, प्रदीप आव्हाड, विजय शेलार, प्रदीप भालेराव, किरण लगड, मारुती भदरगे, संकेत घाडगे, ताराचंद लगड, अनिल क्षीरसागर, नितीन भोसले, राहुल इथापे, मयूर झेंडे, रामदास दळवी, शुभम मोरे, गणेश चंद्रकांत लगड, अजय लगड, अमित लगड, आशिष तिवाटणे, सुनील बुलाखे, विशाल गोरे, संकेत नलगे, अमित कोतकर, ज्ञानेश्वर गाडेकर, भाऊसाहेब शिंदे, गौरव पवार, सागर मोहारे, अविनाश आनंदकर, सुनील नलगे, गणेश सदाशिव लगड, बंडू नवले, पुरुषोत्तम लगड, जयराज लगड, विशाल विलास लगड, पारस गुर्जर, वीर गुर्जर, नंदू लगड, विलास वेठेकर, विशाल सुभाष लगड, अजिनाथ फंड, रामदास भोसले, किरण भिसे, राजेंद्र भापकर.
-----
१९ विसापूर
विसापूर येथील रक्तदानप्रसंगी रक्तदात्यांना झाड भेट देण्यात आले. यावेळी कुकडी कारखान्याचे संचालक विश्वास थोरात, माजी सभापती पुरुषोत्तम लगड, उपसरपंच अमित लगड, नितीन नलगे, नितीन डुबल व इतर.