कर्जत येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:09+5:302021-07-16T04:16:09+5:30
कर्जत : ‘लोकमत ’ चे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथे गुरूवारी आयोजित रक्तदान शिबिराला ...

कर्जत येथील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
कर्जत : ‘लोकमत ’ चे संस्थापक, स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथे गुरूवारी आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी १११ जणांनी रक्तदान केले.
शिबिरात प्रशासकीय अधिकारी, पदाधिकारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी, छात्रसैनिक, व्यापारी, महिला, सफाई कामगार, शेतकरी, हमाल आदी सहभागी झाले होते. ‘लोकमत’, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटी व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. शिबिराचे सकाळी दहा वाजता उद्घाटन झाले.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले, पंचायत समितीचे उपसभापती राजेंद्र गुंड, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, तहसीलदार नानासाहेब आगळेे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे अध्यक्ष रामदास काळदाते, भास्कर भैलुमे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, मुख्याधिकारी गोविंद जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड, दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळ कांबळे, तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, निवासी नायब तहसीलदार सुरेश वाकचौरे, एनसीसी विभागाचे मेजर संजय चौधरी, जिल्हा बँकेचे संचालक आंबादास पिसाळ, भाजपचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सचिन पोटरे, सावता परिषदेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नगरसेविका मनिषा सोनमाळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील शेलार, बहिरोबावाडीचे सरपंच विजय तोरडमल, भाजपचे उपाध्यक्ष रामदास हजारे, अल हिरा मदरशाचे प्रमुख समशेर शेख, नगरसेविका राणी गदादे, नगरसेवक अमृत काळदाते, अनिल गदादे, सतीश समुद्र, डॉ. शबनम इनामदार, भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा आरती थोरात, आशा वाघ, मंदा होले आदी उपस्थित होते.
रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीचे सचिव राजेंद्र जगताप, खजिनदार सचिन धांडे, रोटरीयन डॉ. संदीप काळदाते, नितीन देशमुख, विशाल मेहेत्रे, अभय बोरा, रवींद्र राऊत, काकासाहेब काकडे, घनश्याम नाळे, सदाशिव फरांडे, उपमन्यू शिंदे, मधुकर काळदाते, प्रफुल्ल नेवसे, संदीप गदादे, दयानंद पाटील, नारायण तनपुरे, गणेश जेवरे, निलेश दिवटे, उत्तम मोहोळकर, राहुल खराडे, आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचे अध्यक्ष डॉ. मधुकर कोपनर, राहुल सोनमाळी, संदीप साळुंके, दादासाहेब पारखे, अभय पाटील, विविध सामाजिक संघटनांचे भाऊसाहेब रानमाळ, राहुल नवले, सुनील साळुंके, किसन सूळ, दत्तात्रय गदादे, दत्तात्रय कोपनर, शरद म्हेत्रे, श्रीकांत मरकड, संदीप पांढरकर, संतोष खंडागळे आदी उपस्थित होते.