भारत बंदला नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; पुणतांब्यासह जिल्ह्यात आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 12:02 IST2020-12-08T12:01:43+5:302020-12-08T12:02:11+5:30

नगर जिल्ह्यात शेतकर्याच्या भारत बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून उपोषण सुरू केले. तर पुणतांबा येथे शेतकर्यांनी सरकारचा निषेध करुन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. 

Spontaneous response in Bharat Bandla Nagar district; Agitations in the district including Punatamba | भारत बंदला नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; पुणतांब्यासह जिल्ह्यात आंदोलन

भारत बंदला नगर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद; पुणतांब्यासह जिल्ह्यात आंदोलन

अहमदनगर : नगर जिल्ह्यात शेतकर्याच्या भारत बंदला आज उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राळेगणसिध्दी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून उपोषण सुरू केले. तर पुणतांबा येथे शेतकर्यांनी सरकारचा निषेध करुन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. 

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा म्हणून मंगळवारच्या भारत बंदला नगर जिल्ह्यातील शेतकरी संघटना, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, विविध संस्थांनी पाठिंबा दिला होता. दरम्यान, मंगळवारी सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.

पुणतांबा येथे शिवसेना किसान क्रांती व कृषिकन्या यांनी किसान क्रांतीचे प्रतिक असलेल्या शेतकरी पुतळ्यासमोर सकाळी आंदोलन केले. यावेळी शेतकर्यांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली. नगर, पारनेर, नेवासा, शेवगाव, पाथडीर्, कोपरगाव, राहाता, श्रीगोंदा, जामखेड येथे बंद पाळण्यात आला.  शेतकरी ठिकठिकाणी आंदोलनात उतरले होते. 

 

Web Title: Spontaneous response in Bharat Bandla Nagar district; Agitations in the district including Punatamba

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.