शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
नववर्षाच्या आदल्या दिवशीच गुड न्यूज; सोन्या-चांदीचे दर मोठ्या प्रमाणात घसरले, पटापट चेक करा १८, २२, २४ कॅरेटचे दर
3
बाबा वेंगा किंवा नास्त्रेदेमस नाही... मायक्रोसॉफ्टची भविष्यवाणी! २०२६ मध्ये या ४० क्षेत्रांतील लोकांच्या नोकऱ्या जाणार...
4
"आमदार मेहतांच्या घमेंडीमुळे मीरा भाईंदरमध्ये महायुती तुटली"; मंत्री प्रताप सरनाईकांचा घणाघात
5
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
6
एबी फॉर्म दिला, जल्लोष झाला अन् तासाभरात उमेदवारी रद्द
7
संप सुरू होण्यापूर्वी Swiggy, Zomato बॅकफुटवर; डिलिव्हरी बॉईजसाठी आली चांगली बातमी
8
पैशांची चणचण, कर्जाचा डोंगर... यूट्यूबवरुन शिकले अन् पती-पत्नीने घरातच छापल्या नकली नोटा
9
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
10
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
11
मुंबईवरून निघालेल्या खासगी बसचा सोलापूर-पुणे महामार्गावर अपघात; वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा
12
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
13
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
14
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
15
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
16
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
17
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
18
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
19
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
20
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 11:57 IST

शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला होता. त्यांनी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसनेच महायुती तोडल्याचा आरोप केला.

अहिल्यानगर - महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढविण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला परंतु शिंदेसेनेने अवास्तव जागेची मागणी केल्याने राष्ट्रवादी (अजित पवार) व भाजपा एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहोत, असा पलटवार भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी केला.

राष्ट्रवादी (अजित पवार) व भाजपाने संयुक्त पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यावेळी मोहिते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी (अजित पवार) चे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालिसंग, मुकुल गंधे आदी उपस्थित होते. शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीतून बाहेर पडत असल्याची घोषणा करत स्वबळाचा नारा दिला होता. त्यांनी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसनेच महायुती तोडल्याचा आरोप केला. या आरोपाला भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष मोहिते यांनी शिंदेसेनेनेच अवास्तव जागांची मागणी करत महायुती तोडल्याचे सांगून प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, शिंदेसेनेने भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार) च्या माजी नगरसेवकांच्या काही जागांची मागणी केली होती. भाजपा व राष्ट्रवादी (अजित पवार) ने त्यांच्या माजी नगरसेवकांच्या जागेची मागणी केली, हे महायुती तोडण्यासाठीचे संयुक्तिक कारण नाही. महायुती करण्याचा दोन्ही पक्षांचा प्रयत्न होता. त्यांच्याशी फोनवरून वेळोवेळी संपर्क केला परंतु प्रतिसाद मिळाला नाही. ते महायुतीतून बाहेर पडले, असाही आरोपी मोहिते यांनी केला.

सर्व्हेत नावे असलेल्यांना उमेदवारी

भाजपाकडून माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आले असल्याबाबत पत्रकारांनी छेडले असता मोहिते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहिल्यानगर शहरात जनचाचणी घेतली. त्याआधारे उमेदवारीचे वाटप करण्यात आले आहे. उमेदवारी न मिळाल्याने नाराज झालेल्यांची नाराजी दूर करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रभाग चारमधून एकही उमेदवार नाही

प्रभाग क्रमांक चारमधून भाजप व राष्ट्रवादी (अजित पवार) कडून उमेदवार देण्यात आलेले नाहीत. या प्रभागातून दोन्ही पक्षांकडे एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक चारमधून दोन्ही पक्षांनी उमेदवार दिले नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेवटच्या तासात ठरले उमेदवार निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा मंगळवार शेवटचा दिवस होता. मात्र, दुपारी दोन वाजेपर्यंत कोणत्याही पक्षाने आपली उमेदवारी कोणाला याचा सुगावा लागू दिला नाही. पक्षांचे प्रतिनिधी 'एबी' फॉर्म घेऊन थेट दुपारी दोन वाजता आले. त्यानंतर आपणाला उमेदवारी मिळालेली नाही हे अनेकांना समजले. तीन वाजता अर्ज दाखल करण्याची मुदत संपत असल्याने शेवटच्या एक तासात अनेकांनी दुसऱ्या पक्षांचे एबी फॉर्म घेत अर्ज भरले. सावेडी, जुने महापालिका कार्यालय, केडगाव आणि बुरुडगाव रोड येथील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात सकाळी ११ पासूनच उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. बहुतांश जणांनी दुपारी दोनपर्यंत उमदेवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, दोनपर्यंत प्रमुख पक्षांच्या उमेदवरांना 'एबी' फॉर्म देण्यात आले नव्हते. त्यामुळे बहुतांशी जणांच्या चेहऱ्यावर चिंता होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Alliance Crumbles in Ahilyanagar: Shinde Sena's Move; BJP-NCP to Fight Together

Web Summary : In Ahilyanagar, the BJP and NCP will contest the municipal elections together after Shinde Sena demanded too many seats. BJP claims Shinde Sena caused the split, a charge the Sena denies. Candidate selection was based on a public survey.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Ahilyanagar Municipal Corporation Electionअहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNCPराष्ट्रवादी काँग्रेस