शिक्षकाच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:18 IST2021-01-17T04:18:39+5:302021-01-17T04:18:39+5:30

त्यानंतर त्यांना कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांचा ...

Spend the teacher's medical treatment | शिक्षकाच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च करा

शिक्षकाच्या वैद्यकीय उपचाराचा खर्च करा

त्यानंतर त्यांना कोपरगाव शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांचा वैद्यकीय उपचाराचा सर्व खर्च हा तहसील कार्यालयामार्फत करावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षण समिती गुरुकुल मंडळाचे जिल्हा संपर्कप्रमुख अशोक कानडे यांनी शनिवारी (दि.१६) तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी योगेश चंद्रे यांना दिले आहे.

कानडे म्हणाले, कोपरगाव तालुक्यात नुकतीच २९ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. त्यातच चांदेकसारे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक विलास शिंदे यांची बायपास शस्त्रक्रिया झालेली असतानादेखील त्यांची टाकळी येथील बूथवर १ क्रमांकाचे निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यामुळे येथून पुढे निवडणूक प्रक्रियेत ५० वर्षांवरील शिक्षक, मधुमेह, उच्च रक्तदाब, महिला शिक्षक, तसेच अपंग शिक्षकांची नेमणूक करताना विनंतीपूर्वक विचार व्हावा.

Web Title: Spend the teacher's medical treatment