वाकचौरे, नागवडे, परहर, फटांगरे नगर जिल्हा परिषदेत सभापती
By Admin | Updated: April 3, 2017 15:07 IST2017-04-03T15:07:04+5:302017-04-03T15:07:04+5:30
जिल्हा परिषद अर्थ- बांधकाम समितीच्या सभापतीपदी कैलास वाकचौरे तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अनुराधा नागवडे यांची निवड निश्चित झाली आहे.

वाकचौरे, नागवडे, परहर, फटांगरे नगर जिल्हा परिषदेत सभापती
अहमदनगर : जिल्हा परिषद अर्थ- बांधकाम समितीच्या सभापतीपदी कैलास वाकचौरे तर महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अनुराधा नागवडे यांची निवड निश्चित झाली आहे. कृषी समितीच्या सभापतीपदी संगमनेरचे अजय फटांगरे तर समाजकल्याण समितीच्या सभापतीपदी कर्जतचे उमेश परहर यांना संधी मिळाली आहे.
जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांच्या सभापतीपदाची आज निवडणूक आहे. सकाळी ११ ते १ पर्यंत नामनिर्देश पत्र दाखल करण्याची मुदत होती़ या मुदतीत चार समित्यांसाठी चारच अर्ज आल्याने ही प्रक्रिया बिनविरोध झाल्यात जमा आहे़ दुपारी तीन वाजता पिठासीन अधिकारी सभापतींची अधिकृत घोषणा करतील़ काँग्रेसच्या कोट्यातून अनुराधा नागवडे (श्रीगोंदा) व अजय फटांगरे (संगमनेर) या दोघांना तर राष्ट्रवादीच्या कोट्यातून कैलास वाकचौरे (अकोले) व उमेश परहर (कर्जत) यांना संधी दिली गेली़