उत्कृष्ट रेखाचित्रणासाठी सौम्या जाधवचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:38 IST2021-02-05T06:38:03+5:302021-02-05T06:38:03+5:30
यावेळी सहजयोगी अंबादास येन्नम, गणेश भुजबळ, कुंडलिक ढाकणे, श्रीनिवास बोज्जा, सुनंदा येन्नम, डॉ. अश्विनी जाधव व प्रशिक्षक सुजाता पायमोडे ...

उत्कृष्ट रेखाचित्रणासाठी सौम्या जाधवचा सत्कार
यावेळी सहजयोगी अंबादास येन्नम, गणेश भुजबळ, कुंडलिक ढाकणे, श्रीनिवास बोज्जा, सुनंदा येन्नम, डॉ. अश्विनी जाधव व प्रशिक्षक सुजाता पायमोडे उपस्थित होते. सौम्या जाधव ही डॉ. सचिन जाधव यांची कन्या असून, सुरभी हॉस्पिटलचे संचालक डॉ. दीपक जाधव यांची पुतणी आहे. सौम्या ही अवघ्या १० वर्षांची कलाकार असून, तिची ही पहिलीच रांगोळी आहे. मी जरी मार्गदर्शन केले असले, तरी त्यासाठीची ताकद तिला श्री माताजींनी दिली, असे प्रशिक्षक सुजाता पायमोडे म्हणाले. सौम्या ही पाचवीत कर्नल परब विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहे. तिने ३ दिवस एकूण ३० तास शांत बसून हे चित्र काढले असून, त्याबद्दल तिचे सहजयोग परिवाराकडून कौतुक होत आहे.
-----------
फोटो - ०२सौम्या जाधव
उत्कृष्ट रेखाचित्रणासाठी सौम्या जाधव हिचा सहजयोग परिवाराच्यावतीने नगरसेविका वीणा बोज्जा यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.