लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करु
By Admin | Updated: August 12, 2014 23:20 IST2014-08-12T23:13:14+5:302014-08-12T23:20:15+5:30
पाथर्डी : लवकरच मेळावा घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांनी दिले.

लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करु
पाथर्डी : लवकरच मेळावा घेऊन राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे यांनी दिले.
७० व्या वाढदिवसानिमित्त राजळे यांचा तालुक्यातील श्री क्षेत्र वृध्देश्वर येथे हभप दिनकर महाराज अंचवले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. राजळे म्हणाले, मी आजपर्यंत समाजकारण व राजकारण स्वाभिमानाने केले आहे. यापुढेही राजळे कुटुंब स्वाभिमानानेच राजकारण करीन. आम्हाला कोण शिव्या देतो, त्यांना कसे उत्तर द्यायचे हे समजते. वेळ आल्यानंतर उत्तर देईल, असे राजळे यांनी स्पष्ट केले.
दिनकर महाराज, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, चंद्रकांत म्हस्के, काशिनाथ लवांडे, जगन्नाथ घुगे, नारायण धस, बापूसाहेब भोसले, मिठूभाई शेख, हिमायून आतार, डी.एम.कांबळे, सोमनाथ खेडकर, उध्दव वाघ, राहुरीच्या नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, काशिनाथ बडे यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमास जि.प. उपाध्यक्षा मोनिका राजळे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मधुकर काटे, नगरसेवक मंगला कोकाटे, बंडू बोरुडे, जि.प. सदस्या योगिता राजळे, पं. स. सदस्य भगवान आव्हाड, ‘वृध्देश्वर’चे उपाध्यक्ष रामकिसन बडे, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते. पांडुरंग खेडकर यांनी प्रास्ताविक केले. हिंदकुमार औटी यांनी आभार मानले.
(तालुका प्रतिनिधी)