सोनई, शिंगणापुरात जोरदार पाऊस, विद्यार्थ्यांनी लुटला पावसाचा आंनद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:28 IST2019-06-25T18:19:02+5:302019-06-25T18:28:16+5:30

 नेवासा तालुक्यातील सोनई, शिंगणापूर, हनुमानवाडी, गणेशवाडी तसेच मुळाथडी परिसरातील करजगाव, पानेगाव परिसरात पावसाने हजेरी लावली.

Soni, heavy rain in the spring, looted students looted rain | सोनई, शिंगणापुरात जोरदार पाऊस, विद्यार्थ्यांनी लुटला पावसाचा आंनद

सोनई, शिंगणापुरात जोरदार पाऊस, विद्यार्थ्यांनी लुटला पावसाचा आंनद

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनई, शिंगणापूर, हनुमानवाडी, गणेशवाडी तसेच मुळाथडी परिसरातील करजगाव, पानेगाव परिसरात पावसाने हजेरी लावली.
करजगांव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्याथ्यार्नी पावसाचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्याच्या आंनदातही शिक्षकही सहभागी झाले होते.
शिंगणापूर, हनुमानवाडी,परिसरात जोरदार वार्यासह पाऊस झाला. आकाशात ढगांचा गडगडाटही खूप वेळ सुरुच होता. शिंगणापूर मध्ये जोरदार झालेल्या पावसामुळे जिकडे तिकडे पाणीच वाहत होते. शनैश्वर देवस्थान मंदिर परिसरात तसेच पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. तसेच हनुमानवाडी येथिल मच्छिंद्र वाघ यांच्या राहत्या घरावर लिंबाचे मोठे झाड पडले. यामुळे घराची पडझड झाली मात्र जिवीत हानी झाली नाही.
पावसाला चांगली सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. या पावसामुळे लावलेल्या कपाशीला जीवदान मिळाले आहे. पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. मात्र पावसानंतर मात्र वातावरणात मोठ्या प्रमाणात उकाडा निर्माण झाला होता.

Web Title: Soni, heavy rain in the spring, looted students looted rain