सोनईत पाच ठिकाणी घरफोड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:33 IST2019-05-10T11:32:35+5:302019-05-10T11:33:22+5:30

नेवासा तालुक्यातील सोनईत पाच ठिकाणी घरफोड्यांचा प्रकार घडला. चोरांनी सोने-चांदी रोख रक्कमेसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला

Sonata has five places house burglar | सोनईत पाच ठिकाणी घरफोड्या

सोनईत पाच ठिकाणी घरफोड्या

सोनई : नेवासा तालुक्यातील सोनईत पाच ठिकाणी घरफोड्यांचा प्रकार घडला. चोरांनी सोने-चांदी रोख रक्कमेसह दोन लाखांचा ऐवज लंपास केला. हा प्रकार मंगळवारी (दि.७) पहाटेच्या सुमारास घडला.
सोनई येथील गणेशवाडी रोडवरील संजय कचरू दरंदले यांच्या घरातून सोने-चांदी रोख रक्कमेसह लाखाचा ऐवज चोरांनी पळविला. त्याचबरोबर रंभादास मोहन शेटे, कडूभाऊ संपत मगर, संदीप गणपत कवडे, तसेच काकडे वस्तीवर चोरांनी हात साफ केला.
यापैकी केवळ संजय दरंदले यांनीच पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. चार तोळ्याचे नेकलेस, लहान मुलांच्या हातातील चांदीचे कडे, कमरेची साखळी, चांदीची कळशी, नारळ, दोनशे ग्रॅम चांदी अंदाजे ९० हजारांच्या चांदीचे दागिने, वस्तू व घरातील रोख ५० हजार रूपये असा एकूण एक लाख १९ हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी चोरी झालेल्या ठिकाणी पाहणी केली. श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

Web Title: Sonata has five places house burglar