सोमवंशी यांना कृषी पर्यवेक्षकपदी बढती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:16 IST2021-06-05T04:16:13+5:302021-06-05T04:16:13+5:30
अहमदनगर : कृषी विभागात कृषी सहायक म्हणून २५ वर्षे सेवा केलेल्या अनेक तरुण शेतकऱ्यांना शेतीत नवनवीन प्रयोग करून प्रगतिशील ...

सोमवंशी यांना कृषी पर्यवेक्षकपदी बढती
अहमदनगर : कृषी विभागात कृषी सहायक म्हणून २५ वर्षे सेवा केलेल्या अनेक तरुण शेतकऱ्यांना शेतीत नवनवीन प्रयोग करून प्रगतिशील शेतकरी म्हणून नावारूपास आणणाऱ्या विजय सोमवंशी यांना नुकतीच पर्यवेक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. सोमवंशी यांनी जेऊर मंडळाचा पदभार स्वीकारला.
नगर तालुक्यातील कर्जुने खारे येथे ते गेल्या काही वर्षांपासून कृषी सहायक म्हणून कार्यरत होते. कर्जुनेखारे गावासह इसळक, निंबळक या गावांचीही जबाबदारी त्यांच्याकडे होती. आता पर्यवेक्षक म्हणून ते जेऊर येथे रुजू झाले आहेत. जेऊरअंतर्गत कर्जुनेखारे, इसळक, निंबळक, सावेडी, वडगाव गुप्ता, नागापूर, नवनागापूर, विळद, पिंप्रीघुमट, देहरे, इस्मालपूर, शिंगवे नाईक, नांदगाव, कोळपे आखाडा, मांजरसुंबा, डोंगरगण, पिंपळगाव माळवी या गावांचा समावेश होतो.
..............
जेऊर मंडळातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी बीबीएफ या पेरणी यंत्राचा अवलंब करावा. जास्तीत जास्त क्षेत्र या तंत्रज्ञानाखाली यावे, यासाठी कृषी सहायक, कृषिमित्र यांच्यासह तंत्रस्नेही शेतकरी यांच्या सहकार्याने प्रयत्न करणार आहे.
-विजय सोमवंशी, कृषी पर्यवेक्षक
..............
०४ विजय सोमवंशी