अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता : आमदार निलम गो-हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 16:20 IST2018-09-20T16:20:07+5:302018-09-20T16:20:32+5:30
राज्यात सातत्याने अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले.

अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता : आमदार निलम गो-हे
अहमदनगर : राज्यात सातत्याने अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे. अत्याचार रोखण्यासाठी ठोस कार्यक्रमाची आवश्यकता असल्याचे मत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गो-हे यांनी व्यक्त केले. अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या पार्श्वभुमीवर शिवसेना प्रवक्त्या आमदार नीलम गो-हे यांनी पिडीत कुटुंबाची भेट घेत दिलासा दिला.
आमदार गो-हे म्हणाल्या, अहमदनगरमधील या घटनेसंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात आवाज उठविणार आहे. अत्याचार होऊच नयेत यासाठी ठोस कार्यक्रम राबविणे आवश्यक आहे. या घटनेत एक महिन्याच्या आत न्यायालयात चार्जशीट दाखल करून आरोपीला तीन महिन्यात शिक्षा व्हावी. मनोधैर्य योजनेतून आधी औषधोपचारासाठी पैसे देणे आवश्यक आहे. पीडितेला शिवसेना अभ्यासासाठी पुस्तके देणार आहे. अपहरणाचे उघड समर्थन करणा-या आमदाराला मुख्यमंत्र्यांनी बाजूला सारावे. पंकजा मुंडे केवळ गोड बोलतात मात्र अंमलबजावणी करत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या छिंदमला भाजप पोसत आहे