जमीन समृद्ध करण्यासाठी जमिनीचे आरोग्य जपावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:30 IST2021-02-05T06:30:40+5:302021-02-05T06:30:40+5:30
संगमनेर तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत तालुक्यातील नान्नज दुमाला येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रमात ते ...

जमीन समृद्ध करण्यासाठी जमिनीचे आरोग्य जपावे
संगमनेर तालुका कृषी कार्यालयाअंतर्गत तालुक्यातील नान्नज दुमाला येथे राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे, सरपंच भिमराव चत्तर उपस्थित होते.
या प्रशिक्षणात जमिनीचे महत्व सांगून प्रत्यक्ष जमीन आरोग्य पत्रिकेतील माहिती उपस्थित शेतकऱ्यांना करून देण्यात आली. समृद्ध व उत्तम आरोग्य असलेल्या जमिनीचे महत्व सांगून शेती उत्पादन कसे वाढवता येईल यासंदर्भात माहिती देण्यात आली. जमिनीची घ्यावयाची काळजी, जमिनीतील सेंद्रीय कर्ब याचे महत्व विशद केले. कृषी अधिकारी शेंडे यांनी मार्गदर्शन करताना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.
मंडळ कृषी अधिकारी एम.एम. पंढुरे व कृषी पर्यवेक्षक संदीप जोर्वेकर, स्मिता सहाणे, कृषी सहाय्यक रेहाना शेख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. विनायक गुंजाळ, नानासाहेब चत्तर, सोमनाथ कडनर, भाऊसाहेब कडनर, सदाशिव फड, चांगदेव चत्तर आदी उपस्थित होते.