सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:26 IST2021-09-17T04:26:09+5:302021-09-17T04:26:09+5:30
प्रकाश पोटे हे गेल्या अनेक वर्षांपासून जन आधार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात सामाजिक काम करत होते. अनेक आंदोलनांद्वारे ...

सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पोटे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
प्रकाश पोटे हे गेल्या अनेक वर्षांपासून जन आधार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून नगर जिल्ह्यात सामाजिक काम करत होते. अनेक आंदोलनांद्वारे त्यांनी तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडविले. या सामाजिक कार्याला आणखी पुढे नेण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला. गुरुवारी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर पोटे यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उपरणे घालून पोटे यांना पक्षात प्रवेश दिला. यावेळी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, रोहिदास कर्डिले, शरद दादा पवार, अमित गांधी, दीपक गुगळे, शहनवाज शेख, गणेश निमसे, निखिल शेलार, सुशील कदम आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार संग्राम जगताप, तसेच इतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडून चांगले काम करू, असे पोटेे यांनी प्रवेशावेळी सांगितले.
------------
फोटो - १६पोटे प्रवेश
जन आधार सामाजिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांसह मुंबईत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.