..तर पालकमंत्र्यांना रोखून दाखवाच : शेख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:26+5:302021-09-25T04:21:26+5:30
मिरी : पालकमंत्री हसन मुश्रीफ आजारी असल्यामुळे ते जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्याचेच भांडवल करत ...

..तर पालकमंत्र्यांना रोखून दाखवाच : शेख
मिरी : पालकमंत्री हसन मुश्रीफ आजारी असल्यामुळे ते जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी येऊ शकले नाहीत. त्याचेच भांडवल करत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना जिल्ह्यात येऊ देणार नसल्याचा इशारा दिला. त्यांनी पालकमंत्र्यांनी रोखून दाखवावे. त्यांना राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते उत्तर देतील, असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजू शेख यांनी दिले.
शेख म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांसोबत आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान झालेली हानी न भरून येणारी नाही. मात्र, शेतकऱ्याला सरकारच्या माध्यमातून निश्चितच मदत केली जाणार आहे. पंचनामे पूर्ण होताच प्रशासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
पाथर्डी-शेवगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटीमुळे या नुकसानग्रस्त भागाची राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी तत्काळ पाहणी करून प्रशासनाला योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. पालकमंत्री आजारी पडल्यामुळे ते जिल्ह्यात येऊ शकले नाहीत. त्याचेच विरोधकांकडून भांडवल केले जात असून ही खेदाची बाब आहे, अशी खंत शेख यांनी व्यक्त केली.