...तर मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल; सुजय विखे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 14:57 IST2020-10-24T14:56:51+5:302020-10-24T14:57:31+5:30
नगर जिल्ह्यातील सर्व ड्रीम प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. कारण जिल्ह्यातील प्रत्येक काम हे संरक्षण खात्याशी निगडीत आहे. यासाठी मला प्रत्येक वेळी दिल्लीला जावे लागते. यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, असे प्रतिपादन नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.

...तर मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल; सुजय विखे
अहमदनगर : नगर जिल्ह्यातील सर्व ड्रीम प्रोजेक्टसाठी केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते. कारण जिल्ह्यातील प्रत्येक काम हे संरक्षण खात्याशी निगडीत आहे. यासाठी मला प्रत्येक वेळी दिल्लीला जावे लागते. यासाठी आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल, असे प्रतिपादन नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
नगर-जामखेड राष्ट्रीय मार्गाच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी (दि.२४ आॅक्टोबर) टाकळीकाझी येथे झाले. यावेळी खासदार डॉ.सुजय विखे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावरही टीका केली.
नगर जिल्ह्यातील नगर-जामखेड रोड, बाह््यवळण रस्ता, के. के. रेंज, उढ्ढाण पूल व प्रत्येक मोठी विकास कामे ही संरक्षण खात्याशी निगडीत आहेत. या कामांसाठी मलाही वारंवार दिल्लीला जावे लागते. यामुळे आता मलाच संरक्षणमंत्री व्हावे लागेल. तरच जिल्ह्यातील रखलेल्या मोठ्या प्रकल्पांच्या कामांना गती येईल, असेही डॉ. विखे यावेळी म्हणाले.
जिल्ह्यातील सध्याचे तीन नवे मंत्री आणि काही आमदार आपण किती साधे आहोत याचा आव आणीत आहेत. हा फक्त प्रसिध्दीचा स्टंट आहे. राज्याचा पैसा खाऊन तुम्ही चप्पल घालून फिरत असला म्हणून तुम्ही संत झालात काय? असा सवाल विखे यांनी केला. तर दुसºयाच्या कामांचे श्रेय घेतले तर मतदारसंघात येऊन पोलखोल करील, असा इशाराही विखे यांनी मंत्री गडाख, तनपुरे यांचे नाव न घेताना दिला.