हसरा नाचरा श्रावण आला !
By Admin | Updated: July 27, 2014 01:08 IST2014-07-26T23:21:31+5:302014-07-27T01:08:33+5:30
अहमदनगर : देव दर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे....
हसरा नाचरा श्रावण आला !
अहमदनगर :
देव दर्शना निघती ललना
हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे
श्रावण महिन्याचे गीत
श्रावणमासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे....
असा मनभावन....हासरा...नाचरा.... सुंदर..साजिरा श्रावण रविवार (दि.२७) पासून प्रारंभ होत आहे. व्रत-वैकल्ये, पूजा-अर्चा चोहीकडे दाटून येतील. फळा-फुलांनी बाजार बहरला आहे. मंदिरात देव दर्शनासाठी गर्दी वाढेल. सोशल मीडियावर हिरवागार श्रावण नाचू लागेल. पावसाअभावी हिरवळीची कमतरता सोशल मीडिया भरून काढेल. सात्वीक संदेशांचे महापूर येतील. पोथ्या-पुराण श्रवणासाठी मंदिरेही सज्ज झाली आहेत. धार्मिक ग्रंथाच्या पारायणासाठी मंदिरे जशी सज्ज झाली आहेत़ प्रत्येक सोमवारी शिवमूठ वाहिली जाते. सोमवारच्या दिवसाला उपवासात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे महादेवाच्या मंदिरांमध्ये तसेच इतर धार्मिक स्थळांच्या ठिकाणीही श्रावणानिमित्त दर्शनासाठी गर्दी होते. शिर्डी, सिद्धटेक, नाथ संप्रदायातील मंदिरे, देवीची मंदिरे, विठ्ठल-रुक्मिणीची मंदिरे आदी ठिकाणी गर्दी होते. (प्रतिनिधी)
श्रावण सुरू झाल्यानंतर अनेकजण उपवास करतात. उपवास म्हणजे फक्त खिचडी खाणे किंवा उपाशी राहणे नव्हे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. मांसाहार टाळणे, बाहेर न जेवणे, खिचडी खाणे, दिवसभर उपाशी राहणे याबरोबरच देवदेवतांची उपासना केली तरच श्रावण सार्थकी लागेल.
-बाळासाहेब कांबळे
श्रावण मास महादेवाचा मास म्हणून ओळखला जातो. त्यासाठी रुद्राभिषेक, लघुरुद्र, अभिषेक आदी प्रकारे उपासना केली जाते. पावसामुळे वातावरण खराब झालेले असते. त्यामुळे वातूळ भाज्या तसेच कांदा, लसूण वर्ज्य केला जातो. आरोग्यसंपन्न होण्यासाठीच श्रावण मास आहे. म्हणूनच उपवास आणि उपासना या दोन्ही गोष्टींना महत्त्व आहे.
-दयानंद कृष्णाजी रेखी,
जिल्ह्यातील शिव मंदिरे..
श्रीरामपूर- गोंधवणी मंदिर
नेवासे-हंडी निमगावचे त्रिवेणीश्वर
अकोले-रतनवाडीचे अमृतेश्वर मंदिर, सिद्धेश्वर व लिंगेश्वर
कर्जत-काशीविश्वेश्वर मंदिर
पारनेर-सिद्धेश्वर मंदिर
शेवगाव-मल्लीकार्जुन मंदिर
जामखेड-सौताडा-रामेश्वर, हाळगावचा सिद्धेश्वर, अरणगाव अरण्येश्वर
पाथर्डी-वृद्धेश्वर,खोलेश्वर
श्रीगोंदे-हेमाडपंथी मंदिरे,ढोरजे येथील काशीविश्वेश्वर मंदिर
कोपरगाव-कचेश्वर, शुक्लेश्वर
संगमनेर- निझर्णेश्वर
नगर- डोंगरगणचे रामेश्वर मंदिर,
नगर शहर- शुक्लेश्वर (भिंगार), काळेश्वर (घुमरे गल्ली), अमृतेश्वर (गंज बाजार)
असा आहे श्रावण़़
यंदा पाच सोमवारांची पर्वणी़
नागपंचमी-१ आॅगस्ट (शुक्रवार)
एकादशी-७ आॅगस्ट (गुरुवार)
रक्षाबंधन- १० आॅगस्ट (रविवार)
संकष्ट चतुर्थी- १३ आॅ़ (बुधवार)
कृष्ण जयंती-१७ आॅ़ (रविवार)
अजा एकादशी-२१ आॅ़ (गुरुवार)
पोळा -२५ आॅ़ (सोमवार)