कसाईखान्याची जागा ताब्यात घेण्यात येईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:30+5:302021-01-08T05:04:30+5:30

वहाडणे म्हणाले, शहरातील भरवस्तीत असलेल्या संजयनगर भागातील कसाईखान्यामुळे शहराचे आरोग्य बिघडू नये, यासाठी तो शहराच्या बाहेर मनाई भागात कसाईखाना ...

The slaughterhouse site will be taken over | कसाईखान्याची जागा ताब्यात घेण्यात येईल

कसाईखान्याची जागा ताब्यात घेण्यात येईल

वहाडणे म्हणाले, शहरातील भरवस्तीत असलेल्या संजयनगर भागातील कसाईखान्यामुळे शहराचे आरोग्य बिघडू नये, यासाठी तो शहराच्या बाहेर मनाई भागात कसाईखाना (स्लॉटर हाऊस) उभारला आहे. अनेक वर्षे बंद असलेले हे स्लॉटर हाऊस आम्ही प्रयत्नपूर्वक सुरू करून घेतले. परवानगी आणण्यासाठी स्वतः अधिकारी व कसाई लोकांना घेऊन अहमदनगरला गेलो. अधिकृतपणे व्यवसाय करता यावा. गोवंश हत्या होऊ नये यासाठी हे सर्व केले. कायद्यानुसार फक्त म्हैस वर्गातील प्राणीच कापण्याची परवानगी आहे; पण दुर्दैवाने कोपरगावातील अनेक कसाई कायदे - नियम धाब्यावर बसवून संजयनगर परिसरात सर्रास गोवंश हत्या करत आहेत. राजकीय नेते गोवंश हत्या होत असूनही, जनतेचे आरोग्य धोक्यात येऊनही बोलणार नाहीत. त्याचे कारणही सर्वांना माहीत आहे. नगर परिषद प्रशासनाला अंधारात ठेवून रात्री- अपरात्री होणारी गोवंश हत्या थांबली नाही, तर शहरातील सामाजिक सलोखा बिघडू शकतो. याचे भान सर्वांनीच ठेवण्याची गरज आहे. कोपरगाव नगर परिषदेचे अधिकारी-कर्मचारी शहराचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना मोजके काही जण मनमानी करत असतील तर तेदेखील सहन केले जाणार नाही.

Web Title: The slaughterhouse site will be taken over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.