अहमदनगरमध्ये दोन गटात तलवारीने हाणामारी : सहा जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 17:03 IST2019-01-04T16:58:01+5:302019-01-04T17:03:05+5:30
अहमदनगरमध्ये दोन गटात तलवारीने हाणामारी : सहा जण जखमी अहमदनगर : शहरातील वंजार गल्ली येथे दोन गटात तुफान हाणामारी ...

अहमदनगरमध्ये दोन गटात तलवारीने हाणामारी : सहा जण जखमी
अहमदनगरमध्ये दोन गटात तलवारीने हाणामारी : सहा जण जखमी
अहमदनगर : शहरातील वंजार गल्ली येथे दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना घडली. आज दुपारच्या सुमारास दोन गटात राडा झाला. यामध्ये सहा जण जखमी झाले असून दोन दुचाकीही जाळण्यात आल्या आहेत. घटनास्थळी तातडीने पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.
दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास दोन गटात शाब्दिक चकमक झाली. या चकमकीचे रुपांतर हाणामारीत झाले. लाकडी दांडके, तलवारीने एकमेकांना मारहाण करण्यात आली. याचवेळी दोन दुचाकीही जाळण्यात आल्या. तात्काळ पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. मारहाणीचे कारण अद्याप समोर आले नाही.