एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:53+5:302021-02-05T06:41:53+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. २७ जानेवारीला एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या १०९३ इतकी होती, ...

एकाच दिवशी सहा जणांचा मृत्यू
अहमदनगर : जिल्ह्यात एकाच दिवसात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. २७ जानेवारीला एकूण मृत्यू झालेल्यांची संख्या १०९३ इतकी होती, ती २८ जानेवारीच्या अहवालात १०९९ इतकी दाखविण्यात आली आहे, असे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
जिल्ह्यात गुरुवारी १३३ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर ९२ रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ९०९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.११ टक्के इतके झाले आहे. सध्या ९८१ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता ७१ हजार ९८९ इतकी झाली आहे.
गुरुवारी जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ५१, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ७३ आणि ॲन्टिजेन चाचणीत ०९ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये अहमदनगर शहर (३१), नगर ग्रामीण (१६), पारनेर (१०), पाथर्डी (११), राहाता (७), संगमनेर (२०), शेवगाव (२), श्रीगोंदा (९), अकोले (४), जामखेड (४), कोपरगाव (१३), नेवासा (१), श्रीरामपूर (६), इतर जिल्हा (३) अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान कोरोनाने मृत्यू झालेले रुग्ण गंभीर होते. अन्य उपचार घेत असलेले रुग्ण ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. नागरिकांनी मास्क, सामाजिक अंतर राखावे, सॉनिटायझर वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.