नगर जिल्ह्यात आज सहा नवे कोरोनाबाधित; संगमनेरात तीन रुग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 14:19 IST2020-06-09T14:19:04+5:302020-06-09T14:19:57+5:30

अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी (९ जून) सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. मदिनानगर येथील २३ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे.

Six new corona affected in Nagar district today; Three patients in Sangamnera | नगर जिल्ह्यात आज सहा नवे कोरोनाबाधित; संगमनेरात तीन रुग्ण 

नगर जिल्ह्यात आज सहा नवे कोरोनाबाधित; संगमनेरात तीन रुग्ण 

अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी (९ जून) सहा नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. मदिनानगर येथील २३ वर्षीय महिला कोरोनाबाधित झाली आहे.

संगमनेरात पुनानाका नाईकवाडपुरा येथील ३५ वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाली आहे. यापूर्वीच्या बाधित रुग्णाच्या संपर्कात या दोघी आल्याने यांना लागण झाली आहे. मदिना नगर येथील ५२ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती ड्रायव्हर म्हणून काम करीत असून तो बंगळूरू येथून आला होता.

 राहाता तालुक्यातील दोघे जण कोरोनाबाधित झाले आहेत. निमगाव, निघोज, येथील २३ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

राहाता शहरातील बोठे गल्ली येथील ३६ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. नगर शहरातील पाचपीर चावडी, माळीवाडा येथील ६९ वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित झाली आहे. यापूर्वी बाधित झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने यांना कोरोनाची लागण झाली आहे.

Web Title: Six new corona affected in Nagar district today; Three patients in Sangamnera