सहा मिनिटे वॉक टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:20 IST2021-05-15T04:20:01+5:302021-05-15T04:20:01+5:30
सहा मिनिटे चालण्याआधी व चालल्यानंतर पल्स ऑक्सिमीटर तपासल्याने आपल्या फुफ्फुसाची व हृदयाची कार्यक्षमता तपासता येते. ऑक्सिजनची लेव्हल ९४ टक्यांच्यावर ...

सहा मिनिटे वॉक टेस्ट
सहा मिनिटे चालण्याआधी व चालल्यानंतर पल्स ऑक्सिमीटर तपासल्याने आपल्या फुफ्फुसाची व हृदयाची कार्यक्षमता तपासता येते. ऑक्सिजनची लेव्हल ९४ टक्यांच्यावर असणे गरजेचे आहे. सहा मिनिटे कडक पृष्ठभागावर मध्यम गतीने चालावे. जिन्यावर चढउतार करू नये. ज्या रुग्णांना घरगुती विलगीकरणात उपचार चालू आहेत त्यांनी व ज्यांचा संपर्क कोविड रुग्णांशी आला आहे त्यांनी ही टेस्ट करावी.
१. वयोवृद्ध किंवा हृदयरोग असणाऱ्यांनी ३ मिनिटे चालण्यास पुरेसे आहे. बरोबर कोणीतरी असावे.
२. ही तपासणी करताना ऑक्सिजनची पातळी ९४ टक्केपेक्षा कमी आल्यास किंवा दम लागल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
३. हॅप्पी हायपोक्सिया म्हणजे ज्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यापेक्षा कमी राहात असेल व त्यांना कोणतीही लक्षणे नसतील तर त्यांना या तपासणीमुळे लवकर उपचार घेणे शक्य होईल.