सहा ग्रामपंचायतीत वीज बिल भरणा केंद्र
By Admin | Updated: June 25, 2014 00:29 IST2014-06-24T23:28:17+5:302014-06-25T00:29:11+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीत महावितरण कंपनीचे बिल भरणा केंद्र सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पुढाकार घेतला आहे.

सहा ग्रामपंचायतीत वीज बिल भरणा केंद्र
अहमदनगर : जिल्ह्यातील सहा ग्रामपंचायतीत महावितरण कंपनीचे बिल भरणा केंद्र सुरू होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पुढाकार घेतला आहे.
महाआॅनलाईन कंपनी मार्फत जिल्ह्यात ४२ ग्रामपंचायतीत संग्राम नागरी सुविधा केंद्र सुरू करण्यात आलेले आहेत. या ठिकाणी बँक सुविधांसह विविध सरकारी सेवाचा लाभ देण्यात येत आहे. त्यात आता वीज वितरण कंपनीच्या बिल भरणा केंद्राचा समावेश करण्यात आला.
वीज बिल भरणा केंद्र सुरू करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतीत पळवे (पारनेर), निंबळक (नगर), धामोरी (कोपरगाव), माळीबाभूळगाव ( पाथर्डी) कुळधरण(कर्जत) आणि घुलेवाडी (संगमनेर) यांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या मार्गदर्शनाखाली महाआॅनलाईन कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक निलेश आडकर आणि समन्वयक हर्षल टाक यांचे काम सुरू आहे. कंपनीच्या कामात सुधारणा होत असल्याने कंपनी एक एक पाऊल पुढे जात असल्याचे टाक यांनी सांगितले.