नाल्यात वीजवाहक तार पडल्याने सहा म्हशींचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:21 IST2021-05-18T04:21:41+5:302021-05-18T04:21:41+5:30
भिंगार : जोरदार वाऱ्याने भिंगार नाल्यात वीजवाहक तार पडून वीज प्रवाह उतरल्याने पाणी पिण्यासाठी गेलेल्या सहा म्हशींचा मृत्यू झाला. ...

नाल्यात वीजवाहक तार पडल्याने सहा म्हशींचा मृत्यू
भिंगार : जोरदार वाऱ्याने भिंगार नाल्यात वीजवाहक तार पडून वीज प्रवाह उतरल्याने पाणी पिण्यासाठी गेलेल्या सहा म्हशींचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी एकच्या सुमारास भिंगार परिसरातील कानडे मळा परिसरात घडली.
शेतकरी सदाशिव भाऊसाहेब निस्ताने हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ३० म्हशी चारण्यासाठी भिंगार नाला परिसरात घेऊन गेले होते. दुपारी एकच्या सुमारास काही म्हशी पाणी पिण्यासाठी भिंगार नाल्यात उतरल्या. वीजवाहक तार नाल्याच्या पाण्यात पडून वीज प्रवाह त्यामध्ये उतल्याने पाण्यात उतरलेल्या सहा म्हशींचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. रविवारी रात्रीपासूनच भिंगार, सारसनगर परिसरात जोरदार वारा वाहत आहे. त्यामुळे या भागातील काही झाडेही उन्मळून पडली असून, वीज वाहक ताराही पडल्या आहेत. सारसनगर परिसरातील भिंगार नाला येथे वीजवाहक तार तुटून पाण्यात पडली होती. यामध्ये शेतकऱ्याचे नऊ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले.
---
१७ भिंगार नाला
कानडे मळा येथील भिंगार नाल्यात विजेचा प्रवाह पाण्यात उतरल्याने मृत्युमुखी पडलेल्या म्हशी.