श्रीरामपूरमधील सहा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 18:09 IST2018-05-17T18:09:04+5:302018-05-17T18:09:08+5:30
पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मागील वर्षी केलेल्या आंदोलनात गुन्हा दाखल असलेल्या सहा शेतक-यांना शहर पोलिसांनी अटक केली.

श्रीरामपूरमधील सहा आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना अटक
श्रीरामपूर : पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर मागील वर्षी केलेल्या आंदोलनात गुन्हा दाखल असलेल्या सहा शेतक-यांना शहर पोलिसांनी अटक केली. वेळोवेळी नोटीस बजावूनही हजर होत नसलेल्या या शेतक-यांना बुधवारी मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले. संध्याकाळी सर्वांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
आरोपींमध्ये संजय उत्तम गवारे (रा.वडाळा महादेव), शंकर वसंत मुठे, भास्कर पाराजी शिंदे, चांगदेव पंढरीनाथ मुठे व रघुनाथ पाटीलबा मुठे व भिकचंद कमलाकर मुठे (रा. सर्व मुठेवाडगाव) यांचा समावेश आहे. एक वर्षापासून हे सर्वजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. एप्रिल २०१७ मध्ये हे आंदोलन करण्यात आले होते. याच गुन्ह्यात सोमवारी (दि.१४) युवराज जगताप व अनिल औताडे या शेतक-यांनादेखील अटक करण्यात आली होती. शहर पोलीस ठाण्यात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती.