जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाबाहेर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:33+5:302021-04-02T04:21:33+5:30
छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखाताई सांगळे, छावा जिल्हा सचिव गणेश गायकवाड, छावा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे, विलास कराळे, ...

जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाबाहेर ठिय्या
छावा संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्ष सुरेखाताई सांगळे, छावा जिल्हा सचिव गणेश गायकवाड, छावा विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन खंडागळे, विलास कराळे, महेमूदा पठाण, आदी यावेळी उपस्थित होते. जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीसाठी स्राव दिल्यानंतर सहा ते सात दिवसांनंतर त्याचा अहवाल येतो. तोपर्यंत स्राव देणारा बिनधास्तपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत असतो. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण झपाट्याने वाढत आहे. खासगी प्रयोगशाळेत तातडीने कोरोना चाचणीचा अहवाल दिला जात असताना, जिल्हा रुग्णालयात मात्र मोठा कालावधी लागत आहे. यापूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना तपासणीसाठी स्राव दिल्यानंतर संबंधित व्यक्तीस होम क्वारंटाईन केले जात होते. त्याचबरोबर पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीला हातावर शिक्का मारला जायचा. सध्या अशा प्रकारे कार्यवाही होताना दिसत नाही, असे सांगत संघटनेच्या वतीने या प्रश्नी जिल्हा रुग्णालयात निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने आंदोलन करण्यात आले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा यांनी लवकरच एका दिवसात रिपोर्ट देणार असल्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
.................
०१ सिव्हिल हॉस्पिटल
अहमदनगर जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीचा अहवाल येण्यासाठी सहा ते सात दिवस विलंब लागत असल्यामुळे अखिल भारतीय छावा मराठा संघटनेच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन करताना सुरेखाताई सांगळे, गणेश गायकवाड, सचिन खंडागळे, विलास कराळे, आदी. (छाया-साजिद शेख-नगर)