"साहेब, आमच्या शहराकडे लक्ष्य द्या!", भाजपा जिल्हाध्यक्षांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
By अरुण वाघमोडे | Updated: July 14, 2023 16:00 IST2023-07-14T15:59:59+5:302023-07-14T16:00:43+5:30
गंधे व पारखे यांनी फडणवीस यांची भिवंडी येथे भेट घेऊन चर्चा केली.

"साहेब, आमच्या शहराकडे लक्ष्य द्या!", भाजपा जिल्हाध्यक्षांची उपमुख्यमंत्र्याकडे मागणी
अहमदनगर: नगर शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून वारंवार जातीय तणाव निर्माण होत आहे. अशा स्थितीत शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय ऐरणीवर आला आहे. या परिस्थितीकडे आपण वैयक्तिक लक्ष घालावे, अशी मागणी भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे व जिल्हा उपाध्यक्ष सचिन पारखी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
गंधे व पारखे यांनी फडणवीस यांची भिवंडी येथे भेट घेऊन चर्चा केली. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नगर शहरात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या घटना घडत आहेत. काही समाजकंटक जाणूनबुजून या घटना घडविल्या जात आहेत. त्यामुळे शहरातील शांततेस बाधा निर्माण होत आहे.
पोलीस प्रशासन समाजकंटकांवर कारवाई न करता अनेकदा बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे नगर शहरात अशांतता निर्माण होत आहे. याबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस नगरमधील परिस्थिती सुधारण्यासाठी संबंधीत यंत्रणांना योग्य ते आदेश देण्यात येतील, असे आश्वासन दिले.