सुपा गावात बसवणार एकच गणपती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 16:10 IST2017-08-11T16:10:42+5:302017-08-11T16:10:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सुपा : सुपा (ता. पारनेर) येथे ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसा निर्णय ...

सुपा गावात बसवणार एकच गणपती
लोकमत न्यूज नेटवर्क
सुपा : सुपा (ता. पारनेर) येथे ‘एक गाव, एक गणपती’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसा निर्णय गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
सुपा पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी यासंदर्भात यापूर्वी दोनदा बैठक घेऊन आवाहन केले. त्याला या बैठकीत मूर्त स्वरूप देण्यात आले. सुपा गावात यापूर्वी दहा ते पंधरा मंडळाच्या गणपतींची प्रतिष्ठापना होत असे. निरनिराळ्या मंडळाचे कार्यकर्ते त्यातून हा उत्सव साजरा करीत. त्यांच्यात एकोपा निर्माण करून गावात एकच गणपती असल्यास चांगले कार्यक्रम, सामाजिक उपक्रम राबविण्यात येतील व गावात होणारे ध्वनी प्रदूषण थांबेल, असे सूचविण्यात आले. तरुणाईने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने पोलिसांचा आत्मविश्वास दुणावला. व तीस गावांमधील गणेश मंडळांनी याकामी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी केले. यावेळी पारनेर पंचायत समितीचे उपसभापती दीपक पवार, सरपंच विजय पवार, दत्ता पवार, मनोज बाफना, कैलास दहिवाळ, ग्रामपंचायत सदस्य किरण पवार, संजय पवार, सचिन काळे, पप्पू पवार, अक्षय थोरात, सागर मैड, योगेश रोकडे, संतोष रोकडे, अविनाश कुसाळकर, मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.ं