साईनगरीत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात एकावन्न जोडपी विवाहबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 17:32 IST2018-04-20T17:32:06+5:302018-04-20T17:32:39+5:30
अत्यंत मंगलमय वातावरणात व हजारो व-हाडींच्या साक्षीने एकावन्न जोडपी अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर सायंकाळी विवाह बंधनात अडकली.

साईनगरीत सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळ्यात एकावन्न जोडपी विवाहबद्ध
शिर्डी : अत्यंत मंगलमय वातावरणात व हजारो व-हाडींच्या साक्षीने एकावन्न जोडपी अक्षयतृतियेच्या मुहूर्तावर सायंकाळी विवाह बंधनात अडकली.
साईसिध्दी चँरीटेबल ट्रस्ट, धर्मदाय आयुक्त, नगर, संत जनार्धन स्वामी ट्रस्ट कोपरगाव व शिर्डी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने अवघ्या रूपयात सर्वधर्मिय सामुदायिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिर्डीचे माजी नगराध्यक्ष कैलास कोते यांच्या पुढाकारातून आयोजित सोहळ्याचे हे सतरावे वर्ष होते. आजवर या माध्यमातून सात राज्यातील, २२६ जिल्ह्यातील ४५० तालुक्यातील १३५० हिंदु, २९ मुस्लीम, ३६ बौध्द, १५० आंतरजातीय असे १५७० जोडपी बाहोल्यावर चढली आहेत.
गौरवशाली परंपरा असलेल्या या विवाह सोहळ्याची राज्य सरकारने दखल घेतली. राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी सोहळ्याला आवर्जून उपस्थिती लावली. धर्मादाय आयुक्त विभाग या चळवळसाठी सहकार्य करेल व चळवळ व्यापक करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे डिगे यांनी यावेळी सांगितले़. सोहळ्यासाठी साईसिध्दी रिक्षा संघटना, वाहतुक संघटना आदींनी परिश्रम घेतले. सोहळ्याचे स्वागत हरीश्चंद्र कोते यांनी सुत्रसंचालन फकिरा लोढा व आभार राजेंद्र चौधरी यांनी मानले.