संगमनेरात बाप्पाला साधेपणाने निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:40+5:302021-09-21T04:22:40+5:30
संगमनेर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत रविवारी (दि. १९) संगमनेरातील मानाच्या पहिल्या रंगार गल्ली ...

संगमनेरात बाप्पाला साधेपणाने निरोप
संगमनेर : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत रविवारी (दि. १९) संगमनेरातील मानाच्या पहिल्या रंगार गल्ली सोमेश्वर मित्र मंडळांसह अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाला साधेपणाने निरोप दिला.
रंगारगल्ली सोमेश्वर मित्र मंडळाची सोमेश्वर मंदिरातील ‘श्रीं’ची उत्सव मूर्ती व गणेशोत्सव काळात स्थापना केलेल्या गणेश मूर्तीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर मानाच्या पहिल्या गणरायाचे विधिवत विसर्जन करण्यात आले. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसीलदार अमोल निकम, पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख, मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, मंडळाचे अध्यक्ष मुकुंद गरुडकर, ज्येष्ठ मार्गदर्शक अप्पासाहेब खरे, राजाभाऊ अवसक, माजी नगराध्यक्ष कैलास लोणारी, विश्वास मुर्तडक, नगरसेवक किशोर पवार, शैलेश कलंत्री, नितीन अभंग, किशोर टोकसे, जयवंत पवार, राहुल नेहुलकर, निखिल पापडेजा, अंबादास आडेप, अमोल डुकरे आदी यावेळी उपस्थित होते.
नागरिकांना प्रवरा नदीपात्रात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली होती. नदीकडे जाणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नगरपरिषदेने गणेश मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदांची निर्मिती केली होती. यातही नागरिकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन केले. शहर व उपनगरात गणेश मूर्ती व निर्माल्य संकलन केंद्र उभारले होते. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल स्वयंसेवकांनी संकलित गणेश मूर्तींचे प्रवरा नदीपात्रात विधिवत विसर्जन केले. त्यासाठी बजरंग दलाने विशेष व्यवस्था केली होती. एकवीरा फाउंडेशन, युवक काँग्रेस, एनएसयूआय व नगरपरिषदेच्या कर्मचारी स्वयंसेवक म्हणून काम करत होते. एकवीरा फाउंडेशनच्या वतीने विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना विविध प्रकाराच्या वृक्षांची रोपे भेट देण्यात आली. लायन्स क्लब ऑफ संगमनेरच्या वतीने निर्माल्य संकलन करण्यात आले.
-------------