मक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:22 IST2021-04-02T04:22:10+5:302021-04-02T04:22:10+5:30

नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे शिवसेना शाखा व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवजयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने ...

Simple celebration of Shiva Jayanti at Maktapur | मक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साजरी

मक्तापूर येथे शिवजयंती साधेपणाने साजरी

नेवासा फाटा : नेवासा तालुक्यातील मक्तापूर येथे शिवसेना शाखा व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिवजयंती कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी करण्यात आली.

शिवजयंतीनिमित्त अंगणवाडी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना शिवसेना शाखाप्रमुख गणेश झगरे यांच्या वतीने मास्कचे वाटप करण्यात आले.

या वेळी झालेल्या कार्यक्रमात स्थानिक शिवसैनिक व उदयन गडाख पाटील मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून शिवप्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अंगणवाडी सेविका शोभना साळवे, आरोग्य सेविका कल्पना कोळेकर, छाया साळवे, ग्रामपंचायत कर्मचारी सुनील साळवे, वायरमन मोशे साळवे यांचा कोरोनाकाळातील उत्कृष्ट सेवेबद्दल सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामसेवक संजय वाघ, हिराबाई साळवे, योसेफ चव्हाण, अनिल हिवाळे, अरुण साळवे, दीपक चाबुकस्वार, अविनाश हिवाळे, सुभाष चव्हाण, गोरक्षनाथ नवघरे, श्रीमती जगदाळे, आकाश बनकर, श्रीमती बनकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Simple celebration of Shiva Jayanti at Maktapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.