गंगापूर बंधाऱ्यात मळीमिश्रित पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:12 IST2020-12-28T04:12:17+5:302020-12-28T04:12:17+5:30
राहुरी : राहुरी तालुक्यात प्रवरा नदीवरील गंगापूर बंधाऱ्यात मळीमिश्रित विषारी पाणी मिसळल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकारामुळे ...

गंगापूर बंधाऱ्यात मळीमिश्रित पाणी
राहुरी : राहुरी तालुक्यात प्रवरा नदीवरील गंगापूर बंधाऱ्यात मळीमिश्रित विषारी पाणी मिसळल्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. या प्रकारामुळे परिसरात मोठी दुर्गंधी पसरली आहे.
प्रवरा नदीकाठावरील चिंचोली, कुरणवाडी, गंगापूर, मांडवे, निंबळक, फत्याबाद आदी गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली असून, नागरिक हैराण झाले आहेत. प्रवरा नदीमध्ये वरच्या भागातून मोठ्या प्रमाणावर मळीमिश्रित पाणी सोडले जात आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नदीतील पाणी प्रदूषित होत आहे. या प्रदूषणामुळे नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले असून, मेलेल्या माशांचा तवंग पाण्यावर साचला आहे. या मेलेल्या माशांमुळे मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. लवकरात लवकर संबंधित विभागाने लक्ष घालून नदीकाठच्या लोकांना या समस्येतून मुक्त करावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत.